महाराष्ट्रसांगली

कोविड-19 उपचारासाठी खाटांच्या उपलब्धतेची माहिती नागरिकांना मिळणार आता एका क्लिकवर : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 04 : कोविड-19 उपचारासाठी शासकीय रूग्णांलयाबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुचिबध्द असणारी तसेच बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत असणारी रूग्णालये राखीव ठेवण्यात आलेली आहेत. या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या खाटांचे सुसुत्रिकरण करता यावे यासाठी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार असून त्यासाठी sangli.nic.in या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोविड-19 मध्ये बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम वर तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या smkc.gov.in/covid19 या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
या संकेतस्थळावर Bed Information System मध्ये पॉझीटीव्ह व संशयीत अशा वर्गीकरणामध्ये कोविड उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या आयसीयु व जनरल वॉर्डमधील खाटांबाबत रूग्णालयनिहाय माहिती त्वरीत अद्ययावत करण्याबाबत यंत्रणांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणत्या हॉस्पीटलमध्ये खाटा उपलब्ध आहेत याची वर्गीकरणनिहाय एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.
तसेच कोविड-19 जिल्हा नियंत्रण कक्ष 0233-2374900/0233-2375900 या जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर आणि कोविड-19 सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 0233-2375500/0233-2374500 या दूरध्वनी क्रमांकावरही नागरिकांना माहिती उपलब्ध होईल. नगरपालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त व्यक्तींसाठी रूग्णवाहिका अथवा शववाहिका सेवा आवश्यक असल्यास 0233-2373725 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close