मिरज तालुक्यात भोसे, मौजे डिग्रज, बेडग, काकडवाडी, हरिपूर येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
सांगली, दि. 28 : मिरज तालुक्यातील भोसे, मौजे डिग्रज, बेडग, काकडवाडी व हरिपूर येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
कंटेनमेंट झोन भोसे – पूर्वेस बाळासो चौगुले मर्चंट ते तासवडे गल्ली, पश्चिमेस मिरज रोड ते तासवडे गल्लीकडे जाणारा रस्ता, दक्षिणेस गणेशवाडे गल्ली ते मिरज रोड, उत्तरेस बाळासो चौगुले मर्चंट यांचे घर ते गणेशवाडे गल्ली . बफर झोन – पूर्वेस सुतार गल्ली, पश्चिमेस अंगणवाडी 97 रस्ता, दक्षिणेस मिरज रोड ते शितल चौगुले घर अंगणवाडी 97 कडे जाणारा रस्ता, उत्तरेस महादेव मंदीर ते पार्श्वनाथ मंदीर ते मिरज रोड.
कंटेनमेंट झोन मौजे डिग्रज- पूर्वेस गट.नं 285 अजयकुमार लांडे यांची शेतजमीन, पश्चिमेस गट नं 287 सुंदराबाई बाळगोंडा पाटील यांची शेतजमीन, दक्षिणेस कौटवाट रस्ता, उत्तरेस गट नं 282 भुपाल भाऊ बिरनाळे यांची शेतजमीन. बफर झोन – पुर्वेस गट.नं 283 दादासो भुपाल लांडे यांची शेतजमीन, पश्चिमेस गट नं 288 प्रमोद आण्णासो पाटील यांची शेतजमीन, दक्षिणेस गट नं 295 आदगोंडा नरसगोंडा पाटील यांचा प्लॉट, उत्तरेस गट.नं 279 भिमराव लक्ष्मण भोसले यांचा प्लॉट.
कंटेनमेंट झोन बेडग – पूर्वेस अशोक ओमासे यांचे घर, पश्चिमेस प्रकाश नागरगोजे यांचे घर, दक्षिणेस रावसाहेब बोरगावे यांचे घर. उत्तरेस संजय ओमासे यांचे घर. बफर झोन – पुर्वेस महादेव मंदीर ते जगन्नाथ वाघमोडे यांचे घर , पश्चिमेस महादेव नागरगोजे यांचे घर ते अशोक माळी यांचे शेत, दक्षिणेस अशोक माळी यांचे शेत ते महादेव मंदीर, उत्त्तरेस महादेव नागरगोजे यांचे घर ते महादेव नागरगोजे यांचे घर.
कंटेनमेंट झोन काकडवाडी – पूर्वेस मिरज तासगाव रोड, पश्चिमेस शेतजमीन, दक्षिणेस जि.प.शाळा ते शेतजमीन, उत्तरेस ओढा. बफर झोन – पुर्वेस ओढा ते ग्रामपंचायत कार्यालय, पश्चिमेस शेतजमीन, दक्षिणेस ग्रामपंचायत कार्यालय ते गणेश पाटील यांचे घर, उत्तरेस ओढा.
कंटेनमेंट झोन हरिपूर – अ) पूर्वेस संजय सुखदेव संकपाळ घर ते नितीन अशेक केंचे घर, पश्चिमेस कृष्णा नदी, दक्षिणेस संजय सुखदेव संकपाळ घर ते कृष्णा नदी, उत्तरेस कृष्णा नदी ते नितीन अशोक केंचे घर. आ) पूर्वेस सुनिल बाबसो तांदळे घर ते शिवाजी महादेव जाधव घर, पश्चिमेस दाविद मारूती केंचे घर ते समाज मंदीर, समाजमंदीर ते सुनिल बाबासो तांदळे घर, दाविद मारूती केंचे घर ते शिवाजी महादेव जाधव घर. बफर झोन – पुर्वेस ज्ञानदेव चारूडे घर ते सुनिल परशराम माळी यांची शेती, पश्चिमेस कृष्णा नदी, दक्षिणेस कृष्णा नदी ते सुनिल परशराम माळी यांची शेत, उत्तरेस ज्ञानदेव चारूडे घर ते कृष्णा नदी.
कंटेनमेंट झोन बेडग – पूर्वेस मंगसुळी रस्ता, पश्चिमेस रमेश हरी पाटील यांचे घर, दक्षिणेस सुनिल जाधव यांचे शेत जमीन गट.नं 1856, उत्तरेस शहाजी सावंत यांचे घर, बफर झोन- पूर्वेस सरकारी ओढा, पश्चिमेस बबन पाटील यांची शेतजमीन, दक्षिणेस आप्पासो पाटील यांची शेतजमीन, उत्तरेस तुकाराम बंडगर यांची शेतजमीन
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत.