महाराष्ट्रसांगली

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 22.48 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 28 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 22.48 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 51.50 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 6.65 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 4.80 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 6.62 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 2.86 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 16.74 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 5.40 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 87.22 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 3.8 (45), आयर्विन पूल सांगली 5.3 (40) व अंकली पूल हरिपूर 4.7 (45.11).
जिल्ह्यात गेल्या 24 तासात फक्त वाळवा तालुक्यात 0.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून इतर सर्व तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close