महाराष्ट्रसांगली
लॉकडाऊन कालावधीत नागरिकांकरीता आरटीओ ऑफीसचे कामकाज बंद : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. डी. कांबळे
सांगली, दि. 22 : परिवहन कार्यालयाचे कामकाज अत्यावश्यक सेवेत मोडत नसल्याने कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दि. 22 ते 30 जुलै 2020 या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिकांकरीता आरटीओ ऑफीसचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी कच्चे व पक्के लायसन्स, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण, अनुज्ञप्ती नुतणीकरण इत्यादी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या असतील, अशा अपॉईंटमेंट यथावकाश रिशेड्युल करण्यात येतील. या बाबतचे संदेश संबंधितांच्या मोबाईलवर येतील. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी केले आहे.
Share