कडेगाव तालुक्यातील अमरापूर व येडे येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द
सांगली, दि. 23 : कडेगाव तालुक्यातील अमरापूर व येडे हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. अमरापूर येथील बाधित क्षेत्रात शेवटचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण 20 जून रोजी निदर्शनास आला होता. तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 19 जुलै रोजी पूर्ण झाले आहेत. तर येडे येथील बाधित क्षेत्रात शेवटचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण 24 जून रोजी निदर्शनास आला होता. तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 21 जुलै रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून अमरापूर व येडे येथील बाधित क्षेत्रासाठी अनुक्रमे दि. 22 व 26 जून रोजी जारी केलेली अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.
00000