दुसरे महायुध्द अनुदानधारकांनी हयातीबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास संपर्क करावा: मेजर सुभाष सासने (निवृत्त)
सांगली, दि. 21 : दुसरे महायुध्द अनुदानधारक ज्या माजी सैनिक /विधवा यांनी कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावामुळे मे २०२० चा हयातीचा दाखला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे जमा केला नसेल त्यांनी दूरध्वनी क्रमांक 0233-2671711 वर संपर्क करून हयातीबाबत कळवावे. तसेच आपला दाखला ई-मेल ने zswo_sangli@maharashtra.gov.in वर पाठवावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी केले आहे.
दुसरे महायुध्द लाभार्थीच्या नातेवाईकांनी वरील कार्यवाही शक्य होत नसेल तर लिपीक प्रविण बर्गे मो. नं. 8600893139, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) मो. नं. 9970856438 या मोबाईल नंबर वर संपर्क करून आपल्या वयस्क दुसरे महायुध्द लाभार्थी सोबत व्हीडीओ कॉलवर बोलणे करावे व आपल्या सोईने त्यांचा दाखला कार्यालयात पोहच करावा, असे आवाहनही श्री. सासने यांनी केले आहे.