ताज्या घडामोडी

नोकरी व स्वयंरोजगार करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी : सहायक आयुक्त संजय माळी

सांगली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र सांगली मार्फत सांगली जिल्ह्यातील नोकरी व स्वयंरोजगार करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर कोविड-19 नंतरची रोजगार स्थिती व मुलाखती या विषयावर ऑनलाईन वेब सेमिनार दिनांक 13 जुलै 2020 रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी उद्योजकांकडे मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी युवकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले.
या सेमिनारमध्ये मॉडेल करिअर ठाणे चे आशुतोष माळी, शासकीय आयटीआय चे गटनिदेशक संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रश्नांचे निरसन मान्यवरांनी केले. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ए. बी. तांबोळी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close