ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द
सांगली : कोव्हिड 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कवठेमहांकाळ हद्दीत दि. 14 जून 2020 पासून कंटेनमेंट झोनची अमंलबजावणी करण्यात आली होती. सदर बाधीत क्षेत्रात शेवटचा बाधीत रूग्ण दि. 14 जून रोजी निदर्शनास आला होता. त्यास 28 दिवस दि. 12 जुलै रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्राकरिता जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून दि. 15 जून रोजी जारी केलेली अधिसूचना मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दि. 13 जुलै रोजीच्या अधिसूचनेव्दारे रद्द केली असून सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.
Share