सांगली शहरात वाहतूक नियमन
सांगली : सांगली शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये वाहतूक नियोजन जाहीरनामा दि. 13 ते 27 जुलै 2020 या कालावधीसाठी प्रायोगीक तत्वावर प्रसिध्द केला आहे.
या जाहीरनाम्यानुसार एकेरी वाहतुक मार्ग पुढीलप्रमाणे. (1) शिंदे मळा रेल्वे ब्रिज पासून रेल्वे वसाहतीकडे (कनुभाई देसाई मिलकडे) जाणारा दक्षिणेकडील रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) – कुपवाड येथून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश चालू राहील. (2) टिंबर एरीया कॉर्नर (आण्णा भाऊ साठे प्रवेशव्दार कमान कॉर्नर) ते शिंदे मळा रेल्वे ब्रिजकडे जाणारा उत्तरेकडील रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) – टिंबर एरीया व मार्केट यार्ड कडून येणाऱ्या वाहनांसाठी कुपवाडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश चालू राहील.
सदर वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. याबाबत हरकती, सूचना असल्यास सहा. पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा, सांगली किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयास लेखी स्वरूपात पाठवाव्यात. जेणेकरून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.