ताज्या घडामोडी

शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबांना मोफत जिवनावश्यक वस्तूंची किट वाटप

नागपूर : कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये नागपूर जिल्हयातील ग्रामीण व शहरी क्षेत्रामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजू व वंचित कुटूंबांचा शोधमोहीम घेवून आकडेवारी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांना उपजिविकेसाठी लागणारे जिवनावश्यक वस्तूंची नागपूर ग्रामीण भागात एकूण 57 हजार 404 किट्स (गहू 10 किलो, तांदुळ 10 किलो, सोयाबिन तेल 1 किलो, तुरदाळ 1 किलो, चनादाळ 1 किलो, साखर 1 किलो, चहा पावडर 250 ग्रॅम याप्रमाणे) लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाटप करण्यात आले आहे. तसेच नागपूर शहरी भागातील 7 हजार 938 शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजू व वंचित कुटूंबांना मोफत स्वरुपात किट्सचे वाटप करण्यात आले.
नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना नियमित मासिक धान्यासोबत इतर जिवनावश्यक वस्तूंची किट्स त्यामध्ये खाद्यतेल 1 किलो, बेसन 1 किलो, रवा 1 किलो, जाड पोहे 1 किलो, किठ 1 किलो, हळद 100 ग्रॅम, धनिया पावडर 100 ग्रॅम, चहा पावडर 250 ग्रॅम असे रास्तभाव दुकानामार्फत मोफत स्वरुपात एकूण 77 हजार 673 किट्स वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरी भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना नियमित धान्यासोबत इतर जिवनावश्यक वस्तूची 44 हजार 79 किट्स मोफत वाटप करण्यात आले आहे.
नागपूर जिल्हयातील तहसिल स्तरावरील तसेच नागपूर शहरातील सर्वेक्षणाअंती शिधापत्रिका नसल्याची ओळख पटलेल्या समाजातील अत्यंत गरीब, गरजू व वंचित कुटूंबांना जिवनावश्यक वस्तूची किटमध्ये गहू 10 किलो, तांदुळ 10 किलो, सोयाबिन तेल 1 किलो, तुरदाळ 1 किलो, चनादाळ 1 किलो, साखर 1 किलो, चहा पावडर 250 ग्रॅम याप्रमाणे रास्तभाव दुकानामार्फत मोफत स्वरुपात वाटप करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्याअनुषंगाने सर्वेक्षणअंती नागपूर ग्रामीण 9,396 व शहरी भागातील 12,242 मिळूण यादीमधील सर्व कुटूंबांची संख्या निश्चित करुन नविन 21 हजार 638 कुटूंबांना जिवनावश्यक वस्तूंची किट वाटप सद्यस्थितीमध्ये सुरु आहे. संबंधित कुटूंबांना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close