डॉ. सुरेश आमोणकरांना “गुज”ची श्रद्धांजली

गोवा : गोव्याचे माजी आरोग्यमंत्री व गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले डॉ सुरेश आमोणकर (68) यांचे सोमवारी मडगावच्या कोविड इस्पितळात निधन झाले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता आणि त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. गोवा पत्रकार संघटनेने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
आमोणकर हे पाळी मतदारसंघातून (साखळी) १९९९ व २००२ अशा दोन वेळा निवडून आले होते. फ्रांसिस सार्दींन यांच्या नेतृत्वाखालील सरकारात ते आरोग्यमंत्रीही बनले होते. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचाकडून त्यांनी साखळी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मूत्रपिंडाच्या विकारामुळे ते डायलेसीस घेत होते.
डॉ आमोणकर हे मूळ डिचोली तालुक्यातील आमोणा येथील होते. परंतु नंतर ते साखळीत स्थायिक झाले होते. त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनावर गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने दु:ख व्यक्त केले आहे.