कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली : शासन निर्णयानुसार सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र दांपत्यासाठी असलेल्या कन्यादान योजनेस शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागसवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांना 20 हजार रूपये व स्वयंसेवी संस्थेस 4 हजार रुपये इतके अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र दांपत्य व संस्थांनी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी केले आहे.
याबाबतची अधिकची माहिती, विहित नमुन्यातील अर्ज तसेच योजनेच्या अटी व शर्ती याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, सांगली या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळेल.