शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला आहे. सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार जे सांगली जिल्हा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास 30 जून पर्यंत देण्यात आले होते. लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे कामगारांना जारी करण्यात आलेल्या पासची मुदतही आत 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये शासनातर्फे वेळोवेळी जारी करण्यात येत असलेल्या सूचनांनुसार काही बदल झाल्यास कळविण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.