सांगली

भिलवडी ग्रामपंचायतमध्ये छञपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

भिलवडी : भिलवडी ग्रामपंचायतमध्ये छञपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दुबळ्यांना समान संधी,सन्मान देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणारे,उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे,जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणारे, सत्यशोधकी विचारांना बळ देणारे, शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे लोकराजे शाहू महाराज यांना जयंतीनिमित्ताने भिलवडी ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक आर. डी. पाटील, उपसरपंच चंद्रशेखर केंगार, माजी उपसरपंच मन्सूर मुल्ला, “दर्पण” न्यूजचे मुख्य संपादक अभिजीत रांजणे आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत फोटो पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close