राज्यात ६ लाख ३१ हजार व्यक्ती Quarantine ,१ लाख ३४ हजार गुन्हे दाखल
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १लाख ३४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ६ लाख ३१ हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २३ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १,३४,६०१ गुन्हे नोंद झाले असून २७,५११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ७१ लाख ६४ हजार ८४४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८ हजार ६१७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
*कडक कारवाई*
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या. त्यात ८५८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
*१०० नंबर-१ लाख*
*४ हजारफोन*
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०४,४२४फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७४० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,३१,७१३ व्यक्ती QuarantineQuarantine आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८४,२३६ वाहने जप्त करण्यात आली.
*पोलिस कोरोना कक्ष*
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३३ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३४, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ५१ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला.