महाराष्ट्रसांगली

मान्सून काळातील संभाव्य पूरस्थिती हताळण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी : पालकमंत्री जयंत पाटील

वडनेरे समितीच्या अहवालावर पुढील आठवड्यात चर्चा

सांगली : गतवर्षी 1 ते 10 ऑगस्ट या काळात धरणक्षेत्रात 1800 मिलीमिटर पाऊस झाला तर अन्यत्र 321 मिलीमिटर पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली. या वर्षी मान्सून काळात संभाव्य पुरस्थिती निर्माण झाल्यास सक्षमतेने हातळण्यासाठी प्रशासनाची तयारी सज्ज असल्याचे सांगून येत्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णाकाठच्या लोकप्रतिनिधींचा बोलवून वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात येईल असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपुर्व तयारी आढवा व कोरोना आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, सांगली, मिरज व कुपवाड शहरमहानगरपालिका आयुक्त नितिन कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, सहायक जिल्हाधिकारी अशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. गुणाले, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थितीत होत.
संभाव्य पुरस्थिती हातळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, आवश्यक सामुग्री अद्यावत ठेवावी असे निर्देश देऊन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महसुल मंडळनिहाय पावसाची दैनदिन माहिती सकाळी 8 वा व सायकाळी 6 वा अशा दोन्ही वेळेला घ्यावी. पाण्याखाली जाणारी गावे, प्रामुख्याने नदीकाठची गावे या ठिकाणी पाणीपातळी बद्दल नागरिकांना त्वरीत आवगत करण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा व्यवस्थीत ठेवावी व त्याप्रमाणे पाणी पातळीत वाढ होत असताना त्वरीत सुरक्षीतस्थळी जाण्याबाबत सूचित करावे. रेस्क्युसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसु नयेत यासाठी बोटीच्या सर्व बाजूनी तीची मन्युष्य क्षमता ठळकपणे लिहावी, कोणत्याही परिस्थीतीत ब्रह्मनाळ सारखी घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी. पुरप्रवर क्षेत्रातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल करावे. ज्या नागरिकांकडे जनावरे आहेत. त्यांनी पाणी पातळीत वाढ होण्याची सूचना मिळताच जनावरांसह सुरक्षीतस्थळी जावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटक सरकारमधील अधिकाऱ्यांशीही समन्वय साधण्यात येत असल्याचे सांगून या बैठकीत त्यांनी पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, आरोग्य, पशुसंवर्धन विभागांचा आढावा घेतला. गतवर्षीच्या पुराचा अनुभव लक्षात घेवून जलसंपदा विभागकडून वेळेवर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून, मान्सून काळात यंत्रणेतील प्रत्येक घटकाने अर्लट रहावे. आपले दूरध्वनी, मोबाईल फोन 24 तास सुरु ठेवावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते बी बियाने, किटकनाशके पुरेशा प्रमाणत उपलब्ध करुन द्या, बोगस बियाणेद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही त्याची दक्षताही कृषी विभागाने घ्यावी. पावसाळ्यातील साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा, उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवावी, जनावरांचा लसीकरण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close