विचारपुष्प

पालनकर्ते : डॉ.पतंगराव कदम

जागतिक पालकदिनाच्या निमित्ताने

ज्या संघर्षातून डॉ.पतंगराव कदम साहेबांनी शिक्षण संस्था उभारली ..आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवला.. आपल्या पलूस-कडेगावला सन्मान मिळवून दिला..
आपण अभिमानाने म्हणू शकतो की ते आपल्या परिसराचे भाग्यविधाते आहेत..पालनकर्ते आहेत…

संघर्षाच्या वाटेवर काटे असतातच..पण जिद्दीने मार्ग काढून यश मिळवले की फुलांचा वर्षावही होतो हे साहेबांनी दाखवून दिले.
नव्या पिढीला साहेबांची आत्मगाथा निश्चितच एक प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.
नव्या पिढीचा नवा नायक अर्थात विश्वजित दादांसाठी साहेब म्हणजे चालतं बोलतं ज्ञानपीठ.. साहेबांचा प्रत्येक क्षेत्रातला प्रचंड अनुभव आणि त्यातून मिळणार मार्गदर्शन.. विश्वजित दादांनी ही संधी कधीच सोडली नाही. त्यातूनच तावून सुलाखून विश्वजित दादा तयार झाले.

‘ बाप से बेटा सवाई ‘ असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही.
स्थळ-काळ-परिस्थितीनुसार त्याचं मूल्यमापन होतं. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर डॉन ब्रॅडमॅन ग्रेट.. सुनील गावसकर ग्रेट.. सचिन तेंडुलकर ग्रेट..आणि विराट कोहलीही ग्रेटच..
आज विश्वजित दादा एखादा निर्णय चुकत असतील तर त्यांना सांगायला साहेब नाहीत ही खंत निश्चितपणे त्यांना असेल.
कारण..बाप हा बाप असतो.

मुलांचं घडणं हे आईचं स्वप्न असतं.जिजाऊ-सावित्रीबाईना स्मरुन आदरणीय आईसाहेबांनी विश्वजित दादांना घडवलं.
साहेबांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी भाषण केलं.. *पलूस-कडेगावमध्ये मी तुमचा एक मुलगा म्हणून… एक भाऊ म्हणून काम करेन..*
हीच आईसाहेबांची शिकवण..

आई वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर विश्वजित दादा ज्या पद्धतीने काम करत आहेत.. संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित आहे..

राजकारणात अनेकांची जीभ घसरलीय..पण विश्वजीत दादांची भाषा सुसंस्कृत आहे आणि राहील..

साहेबांचा आशीर्वाद..आई साहेबांची साथ विश्वजित दादांच्या पाठीशी आहे.
पलूस-कडेगावचे भाग्यविधाते साहेब आहेत.
साहेबांच्या माघारी विश्वजित दादा पलूस-कडेगावचे पालनकर्ते म्हणून प्रत्येक माणूस आपला मानून ‘ न भूतो ‘ काम करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आज जागतिक पालक दिन आहे.
पालक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

-दीपक पाटील

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close