ताज्या घडामोडी

वाळवा तालुक्यातील आष्टा गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : वाळवा तालुक्यातील मौजे आष्टा गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – वाळवा तालुक्यातील मौजे आष्टा येथील 1) ज्ञानदेव पवार यांचे घर ते यशवंत साळुंखे यांचे घर 2) यशवंत साळुंखे यांचे घर ते नामदेव पवार यांचे घर 3) नामदेव पवार यांचे घर ते सुरेश पवार यांचे घर 4) सुरेश पवार यांचे घर ते जी.एस. पाटील हायस्कूलच्या पाठीमागून ज्ञानदेव पवार यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) फाळकेवाडी गावाची हद्द 2) घाटगे मळा हद्द 3) पोखर्णी गावाची हद्द 4) नागाव गावाची हद्द.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close