विचारपुष्प

गोरगरिबांना आपलेसे वाटणारे,लढवय्ये व्यक्तीमत्व : आमदार गोपीचंद पडळकर

राजकारण आणि समाजकारणात स्वतःला झोकून देऊन,फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवावर महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीतच ओळख निर्माण करणारे आमचे जिवलग बंधुतुल्य मित्र व युवा नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब यांची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा…. आजच्या काळात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन राजकारण करणे सोपी गोष्ट नाही पण तीव्र इच्छाशक्ती व दुर्दम्य आशावादाच्या जीवावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं पडळकर साहेब मला नेहमी म्हणायचे आज त्यांनी करून दाखविले आहे. 2007 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर पासुन आज भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात वादळ निर्माण केलेलं आहे. त्यांचा हा झंझावात मी अत्यंत जवळुन पाहिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या विठ्ठल पडर\n९४२३९६७६५९माध्यमातून काम करत असताना *अशोक बन्नेनवार* यांच्यासारख्या मात्तबर व्यक्तीने पक्ष सोडल्यावर सांगली जिल्हा अध्यक्ष पदांची जबाबदारी त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या सांभाळत आपल्या नेतृत्वाची चुणुक दाखवत रासपाचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील काम एक नं वर नेण्यासाठी त्यांनी *अहोरात्र परिश्रम* घेतले होते या प्रवासात मी अनेकदा त्यांच्या सोबत होतोच……सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष मा.महादेव जानकर साहेबांनी माढा येथून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगोला सह संपूर्ण मतदारसंघाची धुरा प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी सांभाळली. आपल्या झंझावाती भाषणांनी अनेक सभा गाजवत त्यांनी जानकर साहेबांना मिळालेल्या प्रतिसादामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.त्यानंतर झालेल्या 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला व *रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीच्या(रिडालोस)* माध्यमातून विधानसभा निवडणुक लढवुन समोर मा.सदाशिव पाटील व मा.अनिल बाबर आटपाडीचे देशमुख घराणे असताना तुटपुंजा दिमतीच्या जोरावर आपल्या विश्वासु सहकार्यांच्या पाठबळावर *20 हजारावर* मते मिळविली व खानापुर आटपाडी मतदारसंघात आटपाडीचा माणुसही आमदार होऊ शकतो हे सुचित केले.तसेच खानापुर आटपाडी मतदारसंघातील प्रस्थापित मंडळींना धडकी भरविण्यासारखीही परिस्थिती यानिमित्ताने निर्माण झाली. त्यानंतर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पडळकर साहेब यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन जनतेशी नाळ पक्की ठेवली.2012 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर साहेबांनी करगणी जि.प. गटात देशमुखीच्या कवचकुंडलावरती राजकारण करू पाहत असलेल्या माजी आमदार राजेन्द्र देशमुख यांचे बंधु. अमरसिंह देशमुख विरोधात संबंध मतदारसंघात पॅनेलने चांगले यश मिळवले नवोदित उमेदवार, आर्थिक चणचण असताना अवघ्या काही मतांनी उमेदवार पराभुत झाले पण घाम काढला देशमुख घराण्याचा तो करगणी गटातील गोपीशेठच्या उमेदवारीने फक्त जनतेला दिलेल्या विश्वासार्हतेमुळे त्यानंतरच्या 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरघोस मतदान घेऊन अल्पशा मतांनी ते पराभूत झाले.पण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. राष्ट्रवादीचेअमरसिंह देशमुख यांना मागे टाकुन आटपाडी तालुक्यात आपणच डाॅन असल्याचे दाखवुन दिले. नंतरच्या काळात मा.मुख्यमंत्री व अनेक मंत्री महोदयांना तालुक्यात आणुन विकासकामे करून आटपाडी मतदारसंघात.एमआयडीसी मंजूर करून विकासाच्या मुद्द्यांवर आपण कुठेही कमी नाही हे दाखवुन दिले आहे. *गोपीचंद पडळकर व संघर्ष* आज पडळकर साहेब महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी चे महत्वाचे नेते आहेत पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय ठरला आहे यात त्यांच्या जीवाभावाच्या मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी खुप साथ दिली. शेठही आपल्या कार्यकर्त्यांना भावाप्रमाणे मानतात. *आंदोलन व गोपीचंद पडळकर साहेब* आंदोलनातुन तयार झालेले लढवय्ये नेतृत्व अशी त्यांची ओळख आज महाराष्ट्र भर झालेली आहेत. आटपाडी च्या जनतेला टेंभु योजनेचे पाणी मिळावे यासाठी कराड येथील टेंभु कार्यालयात फोडून माणदेशी माणसाचा संताप व्यक्त केला यासाठी तुरूंगवासही भोगला.जोपर्यंत आटपाडी तालुक्यात पाणी येणार नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला मतदारसंघात येऊ देणार नाही असे त्यांनी दिले महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी आटपाडी त येण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे जो हंगामा झाला तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.याऊलट खरसुंडी येथील नियोजित कार्यक्रमासाठी येणार असताना दस्तुरखुद्द पवार साहेबांनी भिवघाटाच्या खाली न येताच त्यांनी पळ काढला आणि गोपीचंद पडळकरांचे आव्हान नाकारले अर्थात त्यावेळी पडळकर साहेब कार्यकर्त्यांसह खरसुंडी त येउन थांबल्याची कुणकुण पवार साहेबांना लागली होती.
*सह्दयी नेता* पडळकर साहेबांचा हा प्रवास मी अत्यंत जवळुन पाहिला आहे अत्यंत मनमोकळा, कार्यकर्त्यांना जीवापाड जपणारा, रात्री अपरात्री मदतीस धावुन येणारा असा लोकप्रिय नेता मिळाला असल्याचे समाधान आज आटपाडी खानापुर च्या दुष्काळात होरपळलेल्या जनतेच्या मनात आहे.आज पडळकर साहेब यांनी खुप आंदोलने केलेली आहेत यांचा सविस्तर आढावा घ्यायला शब्द तोकडे पडतील .त्यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे,गिरीश महाजन, विजय देशमुख, पंकजाताई मुंडे ,सदाभाऊ खोत यासह अनेक मंत्री व वरिष्ठ नेतेमंडळीशी स्नेहपुर्ण संबंध आहेत त्या बळावर तालुक्यातील जनतेला निश्चितच न्याय मिळवुन देतील.थोड्याच दिवसात पडळकर साहेबांना लाल दिवा देणार असल्याचे भारतीय जनता पार्टी च्या नेतेमंडळीनी वारंवार शब्द दिला होता सत्तेच्या कालावधीत त्यांना तो पुर्ण करताही आला नाही.किंबहुना लोकसभेअगोदर धनगर आरक्षणासाठी आंदोलन उभे केल्यानंतर भाजपने देऊ केलेली विधानपरिषदेची आमदारकी नाकारण्याचे धारिष्ट्य या वाघाने दाखवले होते.आज आमदारकीच्या निमित्ताने तो पाळला आहे.पण पडळकर साहेबांना आमदारकीपुरतं मर्यादित ठेवु नये. कारण सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील माळ रानावर कमळ फुलविण्यात गोपीचंद पडळकर यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.पडळकर साहेबांविषयी लिहावेसे खुप वाटतेय परंतु शब्दांची मर्यादा आहे. २००५~०६ ला जत येथे कर्नाटकात पडळकर साहेबांच्यासोबत घडलेल्या चित्तथरारक घटनेनंतर झालेली भेट व आजचे पडळकर साहेब जमीन अस्मानाचा फरक आहे. अनेक प्रसंग नजरेसमोर तरळतात पण अशा सर्व वेदनादायक गोष्टींना धैर्यानं मात देत त्यावर स्वार होणारा वीर गोपीचंद पडळकर ठरला आहे.

*भविष्यातला विरोधी पक्षनेता …….संभाव्य मंत्री*

आक्रमक, अभ्यासू शैलीने गोपीचंद पडळकर साहेब विधानपरिदषदेचे सत्र गाजवणार असं एबीपी माझाचे अॅकर प्रसन्न जोशी यांनी नुकतेच व्यक्त केले पण याही पुढे जाऊन मी म्हणेन की कुणीही कितीही ठरवलं तरीही गोपीचंद पडळकर साहेबांना आमदारकी पुरते सिमित ठेऊ शकणारचं नाही. कमालीचं पोटॅन्शियल असलेल्या या माणसानं आज महाराष्ट्रात व्यापक जनाधार मिळवला तर आहेच पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून थेट परिचय सक्रीय कार्यकर्ता निर्माण केलेला आहे. आजमितीला भाजपाकडे विधानपरिषदेत बुलंद तोफ म्हणावा असा चेहरा दिसत नाही सत्ताधार्यांना आपल्या आक्रमक शैलीने जेरीस आणु शकतील या निकषांवर गोपीचंद पडळकर साहेब आगामी काळात विधानपरिदषदेचे विरोधी पक्षनेते ही होतील जर महाआघाडीचं सरकार गेले तर गोपीचंद पुन्हा महत्वाचे मंत्रीही असतील कारण काम करत असताना सातत्याने काम करण्याची उर्मी त्यांच्यात आहे. समाजाच्या जीवावर आमदारकी मिळाली सहा वर्षांनी तो माणूस महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातुन गायब होतो.पण गोपीचंद पडळकर साहेब या पठडीतले नेते नाहीत संधी मिळाली त्यांचं सोनंच करणारा हा माणूस आहे. एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्य क्षितीजावर गोपीचंद पडळकर यांचे नाव असेल ते पाहण्यासाठी माझं मन उत्सुक आहे. कारण आम्हीही एवढ्यात समाधानी नाही.

*गोपीचंद पडळकर साहेब यांना आमदरकीसाठी खुप खुप शुभेच्छा त्यांना निरोगी दिर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप सदिच्छा त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून गोरगरीब शोषित,पिडित जनतेला निश्चितच लाभ होईल यात कोणतीही शंका नाही*

शेवटी एवढंच म्हणता येईल,

“लहरोंसे डरकर नौका पार नही होती और कोशिष करनेवालोंकी कभी हार नही होती!”

-विठ्ठल पडर
९४२३९६७६५९

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close