सांगली

भिलवडी,ब्रम्हनाळ ,सुखवाडी,चोपडेवाडीत महापूरासाठी यांत्रिकी बोटी दाखल होणार : जिल्हा नियोजन मधून मंजुरी

जि. प. सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांचे विशेष प्रयत्न
भिलवडी : जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांच्या विशेष प्रयत्नातून पुढील काळामध्ये महापूर येण्याची शक्यता आहे .यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून सुरेंद्र वाळवेकर यांनी पुढील काळात महापुराचा धोका लक्षात घेऊन भिलवडी ब्रह्मनाळ,सुखवाडी, चोपडेवाडी या गावासाठी यांत्रिकी बोटी मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद सांगली मार्फत मंजुरी घेतली आहे. लवकरच या बोटी महापूर अगोदर भिलवडी मध्ये दाखल होतील, यासाठी सुरेंद्र वाळवेकर यांनी खासदार संजय काका पाटील ,आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले आहेत.

पाठीमागील वर्षी महापूर मोठ्या प्रमाणात आला होता. तसाच महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हवामान खात्याने पाऊस जास्त असल्याचे वर्तविले आहे. पाऊस जास्त असल्याचे सांगितले आहे, कोयना धरण अगोदरच भरलेले आहे जर पाऊस मोठया प्रमाणात झाला तर महापूर येणार असल्याची शक्यता आहे, पाऊस पडण्याची प्रशासनाला खात्री वाटत असून यासाठी वाळवेकर यांनी या यांत्रिकी बोटीची व्यवस्था केलेली आहे.
मागील वर्षी भिलवडी परिसरामध्ये मोठया प्रमाणात महापूर आला होता. त्यावेळी ब्रह्मनाळ मधील नागरिकांनी गावातीलच बोटीने गावातून बाहेर पडण्यासाठी प्रवास केला असता बोट उलटी होऊन बोटीमधील प्रवासी मृत्युमुखी पडले होते .अनेक कुटुंबे उदध्वस्त झाली होती. अनेक कुटुंबे चोपडेवाडी ,ब्राम्हनाळ, सुखवाडी,भिलवडी याठिकाणी अडकून पडले होते. यासाठी एन.डी. आर. एफ चे जवान बोलवून अनेक कुटुंबे बाहेर काढले होते .तोच धोका ध्यानात घेऊन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी जिल्हा नियोजन समिती कडून व जिल्हा परिषद मार्फत यांत्रिकी बोटी मंजूर करून घेतल्या आहेत. लवकरच भिलवडी मध्ये बोटी दाखल होतील. या कामामुळे वाळवेकर यांचे भिलवडी परिसरातून अभिनंदन होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close