सांगली
महापुरामुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत करा : सहकार मंञी विश्वजीत कदम

पलूस : गेल्या वर्षी महापुरामुळे बाधित झालेल्या भिलवडी, अंकलखोप,नागठाणे, आमणापूर,सुखवाडी, ब्रम्हनाळ, धनगांव या गावातील लोकांबरोबर पलूस पंचायत समिती कार्यालयात चर्चा केली. काही अडीअडचणी, तसेच तांत्रिक त्रुटीमुळे ज्यांना मदत मिळाली नाही त्यांना तात्काळ सहकार्य करावे, असा आदेश सहकार मंञी विश्वजीत कदम यांनी दिला.
आगामी काळात पाऊस काळ जास्त झाला तर काय उपाययोजना करायच्या याबद्दल त्या त्या गावच्या ग्रामस्थांनकडून सूचना जाणून घेतल्या. पूर पट्यात असणाऱ्या गावातील काही रस्ते नादुरुस्त आहेत. ते त्वरित पूर्ण व्हावेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Share