महाराष्ट्रविचारपुष्प

दर्दी वर्दी..!

लोकांना न्याय मिळावा म्हणून आपलं कुटुंब सोडून धडपडत राहते .
आपल्या घरातील दुःख निमूटपणे सहन करून कर्तव्य करत राहते अशी आमची दर्दी वर्दी .
गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सतत झटत राहते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमी सतर्क राहते अशी आमची दर्दी वर्दी.
पती-पत्नी ,भाऊ -भाऊ यांच्या भांडणात त्यांना वडीलधाऱ्याच्या नात्याने समजून सांगते .प्रसंगी दरडावून सांगते अशी आमची दर्दी वर्दी.
सर्व धर्मात जातीय सलोखा निर्माण करते .
सर्व समाजातील लोकांनी एकोप्याने राहावे.
यासाठी सतत प्रयत्न करून एकमेकांविषयी प्रेम भावना जीवंत ठेवते अशी आमची दर्दी वर्दी .
आया-बहिणींच्या अब्रुची लक्तरे टाकणाऱ्यांना धडा शिकवते .त्यांच्यावर कायद्याचा जरब बसवून पिडीतेला न्याय देते अशी आमची दर्दी वर्दी .
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्यातील अर्थाप्रमाणे सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी सतत प्रयत्न करत राहते अशी आमची दर्दी वर्दी .
कोरोना सारख्या महामारीत सर्वांना घरात बसण्यासाठी प्रवृत्त करते प्रसंगी कायद्याचा बडगा उगारते .
तेही त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी व हितासाठी अशी आमची दर्दी वर्दी.

अतुल जगदीश माळी

पोलिस नाईक सांगली पोलिस भिलवडी पोलिस ठाणे. (7798202877)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close