शिरोळ तालुक्यातील कोरोनाबाबत परिस्थितीचा आढावा : आरोग्यमंत्री यड्रावकर

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कोरोनाबाबत एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिरोळ तालुक्यातील गावागावांत भेटी देण्यास सुरुवात केली. तालुक्यातील घोसरवाड, तेरवाड, औरवाड, कवठेसार, दानोळी व जैनापूर या गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला,अशी माहिती आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी दिली.
गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित ग्रामस्थ व अधिकारी यांच्यासमवेत कोरोना, संभाव्य महापूर व इतर बाबींविषयी चर्चा देखील केली.
महापुराच्या संकट टाळण्यासाठी विविध उपाययोजना सरकार व प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जात आहे. परंतु तशी परिस्थितीत उद्भवलीच तर, कोरोना आणि महापूर अशा दोन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तरी आपण सर्वांनी एकजुटीने प्रशासनाला सहकार्य करावे, असं मत आरोग्य मंत्री यावेळी मांडलं.
गावातील लाॅकडाऊन, बाहेर गावाहून आलेल्या ग्रामस्थांसाठीची सर्व आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये त्यांची केली जाणारी चाचणी अशा महत्त्वांच्या प्रश्नांचा आढावा घेतला
बैठकीस हजर असलेल्या आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, गावकामगार तलाठी, पोलीस पाटील, कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचित केले.
लोकडाऊन शिथिल जरी केले असले तरीही ग्रामस्थांनी स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंग ठेवत सर्व व्यवहार शासनाने निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे सुरू ठेवावेत असे यावेळी आवहान केले. नियमांचे पालन करणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असून, त्याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा, असे मत व्यक्त केले.
या दौऱ्यादरम्यान घोसरवाड येथे विजितसिंह शिंदे सरकार, सरपंच बाबासो पुजारी, पोलीस पाटील अजित खोत, श्री. विद्यासागर बारवाडे, श्री. सुनील अकीवाटे.
तेरवाड येथे श्री. शाबगोंडा पाटील, श्री. विलास कांबळे, श्री. भास्कर कांबळे, काजल कांबळे, श्री. प्रकाश तराळ, श्री. बंडू बरगाले.
औरवाड येथे सरपंच श्री. आश्रफ पटेल, उपसरपंच श्री. नितीन शेट्टी, माजी उपसरपंच श्री. शफि पटेल, श्री. दादेपाशा पटेल, पोलीस पाटील श्री. अमोल कोले, श्री. पाशा पटेल, श्री. प्रताप आगरे, श्री. प्रफुल ऐनापुरे व श्री. शैलेश आगरे.
तसेच कवठेसार येथे सरपंच सौ. दिपाली भोकरे, उपसरपंच श्री. संदीप कांबळे, श्री. तात्यासाहेब भोकरे, श्री. सुभाष माने, श्री. भरत तेरदाळे, श्री. बाबासो भोकरे, श्री. मल्लू जैनापुरे, श्री. केजी कांबळे, श्री. वसंत गुरव.
दानोळी येथे सरपंच सौ. सुजाता शिंदे, श्री. सर्जेराव शिंदे, श्री. महादेव धनवडे, पंचायत समिती सदस्य श्री. सुरेश कांबळे, पैलवान श्री. केशव राऊत, श्री. राम शिंदे, श्री. केशव धोंडीबा राऊत, श्री. पिटू पाराज, श्री. गुंडू दळवी.
जैनापूर येथे सरपंच श्री. विजय पाटील, श्री. बाबासो कांबळे, माजी सरपंच सौ. संन्मती पाटील, श्री. आदीकुमार पाटील, श्री. राजकुमार पाटील, श्री. विक्रम पाटील, श्री. सचिन चौगुले, श्री. रावसो कांबळे यांच्यासह गावागावात ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, यांच्यासह ग्रामस्थ देखील उपस्थित होते.