ताज्या घडामोडी

आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आ.) सोनारसिध्द नगर येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आ.) सोनारसिध्द नगर येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आ.) सोनारसिध्द नगर येथील 1) सोनारसिध्द नगरचे पूर्व – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते जालींदर मारूती चव्हाण यांचे घर 2) सोनारसिध्द नगरचे पश्चिम – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते सोनारसिध्द मंदिर भिंत हद्द 3) सोनारसिध्द नगरचे दक्षिण – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर पुजारवाडी (आ.) – आटपाडी रस्ता 4) सोनारसिध्द नगरचे उत्तर – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर धनंजय नामदेव जाधव यांचे पत्रा शेड , या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) सोनारसिध्द नगरचे पूर्व – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते देशमुखवाडी हायस्कूल 2) सोनारसिध्द नगरचे पश्चिम – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते संदिपान शंकर पुजारी यांचे घर 3) सोनारसिध्द नगरचे दक्षिण – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते शुक्र ओढा हद्द 4) सोनारसिध्द नगरचे उत्तर – सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते सिताराम लिगाडे यांचे घर.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close