आरोग्यमहाराष्ट्रसांगली

शिराळा तालुक्यातील मौजे निगडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोविड 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शिराळा तालुक्यातील निगडी हद्दीत दि. 26 एप्रिल 2020 पासून कंटेनमेंट झोनची अमंलबजावणी करण्यात आली होती. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पॉझीटीव्ह केस दि. 26 एप्रिल 2020 रोजी निदर्शनास आली होती, त्यास दिनांक 23 मे 2020 रोजी 28 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्यातील निगडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक 24 मे 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
शिराळा तालुक्यातील निगडी हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. त्या ठिकाणी तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close