ताज्या घडामोडी

शिराळा तालुक्यातील रेड गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : शिराळा तालुक्यातील रेड गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – शिराळा तालुक्यातील रेड येथील 1) संग्राम मोहन सातपुते यांचे घर ते माणिक नारायण पाटील यांचे घर 2) माणिक नारायण पाटील यांचे घर ते बळवंत ईश्वरा कापूरकर यांचे घर 3) बळवत ईश्वरा कापूरकर यांचे घर ते पोपट बापू माने यांचे घर 4) पोपट बापू माने यांचे घर ते जितेंद्र भगवान पाटील यांचे घर 5) जितेंद्र भगवान पाटील यांचे घर ते संग्राम मोहन सातपुते यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – शिराळा तालुक्यातील रेड येथेे 1) कृष्णराव भाऊराव पाटील ॲकॅडमी ते सह्याद्री पब्लक स्कूल 2) सह्याद्री पब्लीक स्कूल ते खेड शिव 3) खेड शिव ते हॉटेल राजगड 4) हॉटेल राजगड ते निकम मळा 5) निकम मळा ते कृष्णराव भाऊराव पाटील ॲकॅडमी.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close