ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासनाकडील दि. 19 मे च्या आदेशामधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी

सांगली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत विविध प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले असून त्यांचा अंमलबजावणी कालावधी दिनांक 31 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडील दि. 19 मे 2020 च्या आदेशान्वये लॉकडाऊन नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील पारित करण्यात आलेला क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-133/2020 दि. 14 एप्रिल 2020 हा आदेश रद्द करण्यात आला असून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाकडील दि. 19 मे 2020 च्या आदेशामधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र शासनाकडील क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 19 मे 2020 च्या आदेशामध्ये ज्या बाबी नमूद नाहीत त्या बाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेले आदेश अंतिम राहतील. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इंन्सीडंट कमांडर तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी दि. 22 मे 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्यात यावी, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close