ताज्या घडामोडी

सांगली महानगरपालिका हद्दीत कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्र. 2 हडको कॉलनी, भारतनगर, मिरज या परिसरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत 1) मनपा उर्दु शाळा क्र. 33 ते ब्रुंद्रा काळे घर पर्यंत 2) बुंद्रा काळे घर ते मैनुद्दीन बागवान घर पर्यंत 3) मैनुद्दीन बागवान घर ते मयुर निवास पर्यंत 4) मयुर निवास ते क्लासिक फोटो स्टुडिओ पर्यंत 5) क्लासिक फोटो स्टुडिओ ते फज्जेइलाही किराणा दुकान पर्यंत 6) फज्जेइलाही किराणा दुकान ते मनपा उर्दु शाळा क्र. 33, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – महानगरपालिका क्षेत्र 1) 100 फुटी रोड आयलँड ते मोहसीन बंगला पर्यंत 2) मोहसीन बंगला ते श्री कृष्ण जेन्टस पार्लर पर्यंत 3) श्री कृष्ण जेन्टस पार्लर ते मुजावर पिठाची गिरणी पर्यंत 4) मुजावर पिठाची गिरणी ते माजी सैनिक स्तंभ पर्यंत 5) माजी सैनिक स्तंभ ते A1 चिकन दुकान पर्यंत 6) A1 चिकन दुकान ते 100 फुटी रोड आयलँड पर्यंत.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close