उद्योजक गिरीश चितळे यांची भिलवडी वाचनालयास ग्रंथ भेट

भिलवडी : भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे नूतन अध्यक्ष व चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी संत वाड. मयाचे तेरा खंड वाचनालयास भेट दिले. सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी या भेटीचा स्विकार केला.
यावेळी गिरीश चितळे म्हणाले की,भिलवडी सार्वजनिक वाचनालय हे जुने व समृद्ध असे वाचनालय आहे.कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाउन उठेपर्यंत वाचनालयाचा वृत्तपत्र विभाग बंद ठेवण्यात आलेला आहे.प्रशासनाचे नियम व सोशल डिस्टन्सिंग पाळून पुस्तक देवघेव विभाग सभासदांच्या सोयीसाठी सुरू आहे.त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा. संचालक हणमंत डिसले यांनी लग्नाच्या वाढदिवसा निमित्त वाचनालयास एक हजार एक रुपये देणगी दिली.सुभाष कवडे यांनी वाचनालयाच्या वतीने ग्रंथभेटी बद्दल गिरीश चितळे यांचे आभार मानले.यावेळी उद्योजक मकरंद चितळे,वाचनालयाचे संचालक डी.आर.कदम,हणमंत डिसले,प्रविण शेटे,दत्ता उतळे,महादेव जोशी,शरद जाधव,ग्रंथपाल वामन काटीकर आदी उपस्थित होते.