आरोग्यसांगली

सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 75 हजार 200, जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 35 हजार 500 हून अधिक

सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानूसार दिनांक 20 मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात 75 हजार 223 व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेले असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून 35 हजार 571 व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 784 इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे.
यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 29 हजार 650 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 45 हजार 573 व्यक्तींचा आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या 8 हजार 692 तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या 26 हजार 869 व्यक्तींचा समावेश आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close