
कवठेमहंकाळ/ प्रतिनिधी : चंद्रकांत खरात
कवठेमहंकाळ तालुक्याच्या उतरेला आसणारया व कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणुन गणल्या जाणारया घाटमाथयावरील घाटनांद्रे, तिसंगी, कुंडलापुरा, गर्जेवाङी, वाघोली, जाखापुर व कुची परिसरात पेरणीपुर्व मशागतीना चांगलाच वेग आला असुन संपूर्ण शिवारात बळीराजाची लगबग दिसत आहे.
सततच्या दुष्काळाने बेजार झालेल्या या पट्यात गेल्या वर्षी परतीच्या अखेरीस पावसाने धुवांधार फलंदाजी केली त्यामुळे सध्या या परिसरात पाण्याची स्थिती चांगली आहे. या पट्यात संपूर्ण शेतीही पावसावर आधारीत आहे.कुची, जाखापुरचा काही भाग सोडला तर संपूर्ण घाटमाथा हा जलसिंचन योजनेपासुन वंचित आहे. टेंभू जलसिंचन योजनेंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसाजलसिंचना योजना ही गेल्या दीड वर्षापासून जैसे थे च्या अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील संपूर्ण शेती ही पावसावर आधारीत आहे. सतत दुष्काळाने बेजार झालेल्या व पुर्वानुभव लक्षात घेता बळीराजाला मशागती व पेरा हा मोठया धाडसाने करावा लागतो.
चालू वर्षे एकदोन आवकाळी पाऊस चांगले झाल्याने व चालू वर्षे पाऊस वेळेवर व चांगला होणार आसल्याचे भांकीत हवामान खात्याने केल्याने बळीराजामध्ये फिलगुडचे वातावरण आहे. त्यामुळे बळीराजा सध्या शेतात नांगरट,फण कुळव करून पालापाचोळा व दगडगोटे गोळा करून बांधबंदिस्त करून रान पेरणीसाठी सज्ज करू लागला आहे. सततच्या दुष्काळाने बैलाची संख्या रोडवल्याने व कमी वेळात जादा काम होण्यासाठी मशागतीसाठी ट्रॅक्टर चा आधार घेत आहे. या पट्यात खरीपाची ज्वारी,बाजरी,उडीद, मुग,मटकी,सोयाबीन भुईमूग यासारखी पिके मोठया प्रमाणात घेतली जातात जमीन कसदार व चांगल्या प्रतीची असल्याने पावसाने चांगला हात दिला तर खुप मोठा पिक परतावा या जमीनीतुन मिळतो पण हे चित्र बरेच वर्षे झाली पाहयाला मिळले नाही हे माञ खरे.