ताज्या घडामोडी

लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने विविध प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी 31 मे पर्यंत करण्याचे आदेश

सांगली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत विविध प्रतिबंधात्मक ओदश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशांचा अंमलबजावणी कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत निर्गमित करण्यात आलेला होता. तथापि महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 मे 2020 च्या आदेशान्वये लॉकडाऊन कालावधी दि. 31 मे 2020 पर्यंत वाढविल्याने विविध प्रतिबंधात्मक आदेशाचा कालावधीही दि. 31 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या आदेश क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-137/2020 दि. 14 एप्रिल 2020, क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-138/2020 दि. 14 एप्रिल 2020, क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-139/2020 दि. 14 एप्रिल 2020, क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-140/2020 दि. 14 एप्रिल 2020, क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-167/2020 दि. 18 एप्रिल 2020, क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-260/2020 दि. 3 मे 2020, क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-263/2020 दि. 4 मे 2020, या आदेशांची अंमलबजावणी दिनांक 31 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इंन्सीडंट कमांडर तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close