ताज्या घडामोडी

सातारा : चार जण कोरोना मुक्त, सोडले घरी

127 जणांचा अहवाल निगेटिव्ह,83 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील एका आरोग्य कर्मचारी जी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत होती. तसेच मुंबईवरून आलेला एक बाधित रुग्ण आणि सह्यादी रुग्णालय, कराड येथील 2, यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे या चौघांना आज रुग्णालयातुन सोडण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

*127 जणांचा अहवाल निगेटिव्ह*
तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64 असे एकूण 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे बी. जे. वैद्य’कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 11 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

*83 जण विलगीकरण कक्षात दाखल*
क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 75 असे एकूण 83 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close