विजयनगर येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : कोव्हिड 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाह शहर महानगरपालिका हद्दीतील विजयनगर येथे दि. 19 एप्रिल 2020 पासून कंटेनमेंट झोनची अमंलबजावणी करण्यात आली होती. त्यास 28 दिवस पूर्ण झाले आहेत. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पॉझीटीव्ह केस दि. 18 एप्रिल 2020 रोजी निदर्शनास आली असून तदनतंर एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. त्या नतंर सलग 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सांगली मिरज कुपवाह शहर महानगरपालिका हद्दीतील विजयनगर येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १७ मे २०२० रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
सांगली मिरज कुपवाह शहर महानगरपालिका क्षेत्रातील विजयनगर हद्दीत कोरोना बाधित रूग्ण् आढळून आला होता. त्या ठिकाणी तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.