सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 49 हजार 400 हून अधिक, जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 19 हजार 500 हून अधिक
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानूसार दिनांक 15 मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात 49 हजार 468 व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेले असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून 19 हजार 527 व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 68 हजार 995 इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे.
यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 21 हजार 865 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 27 हजार 603 व्यक्तींचा आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या 6 हजार 138 तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या 13 हजार 389 व्यक्तींचा समावेश आहे.