ताज्या घडामोडी

कुंडलवाडी येथील तरुण कोरोना बाधित : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

सांगली : कुंडलवाडी तालुका वाळवा येथे मुंबईहून आलेला ३०वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याची तपासणी करण्यात आली होती. लक्षणे कोरोणा सदृश्य असल्याने मिरज सिव्हिल हॉस्पिटलकडे संदर्भित करण्यात आले.या तरूणाचा काल स्बाव घेण्यात आला होता . त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे.
या तरुणाचे संबंधित कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून अनुषंगिक उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close