खासगी दूध संघाची मनमानी : बापूराव सोलनकर

दूध दर कमी देणाऱ्या संघांवर कारवाई करा:- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी
बारामती:- पश्चिम महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुधव्यवसायाला प्राधान्य दिले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन च्या काळात दुधाच्या बाजारात कमालीची घट झाली आहे त्यामुळे राज्यातील दूध व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यामध्ये दूध दरामध्ये खाजगी दूध संघ चालकांनी मात्र मनमानी पद्धतीने १९, २० रुपये दर देत आहेत अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. एकीकडे सहकारी दुधसंघांनी २५ दर जाहीर केला आहे तर खाजगी दूध संध मात्र कमी दराने दूध घेतात अशा संघांवर काडक कारवाई करावी दौंड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे निरीक्षक बापुराव सोलणकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे.
आज शेतकरी अडचणीत आलेला असताना शेतकऱ्यांना या दिवसामध्ये आधार देण्याचे काम करा बळीराजाला उध्वस्त करण्याचे काम करू नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापूराव सोलणकर यांनी केले आहे.
यावेळी सोलनकर बोलताना म्हणाले की लॉक डाऊन मूळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे अगोदरच चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला जोडधंदा असलेल्या दुधव्यवसायाला ही देशामध्ये लॉक डाऊन असल्यामुळे दुधाचा खप कमी झाल्यामुळे बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी मध्ये सापडला आहे अशा परिस्थिती मध्ये दुधाला जाणून बुजून दूध दर कमी दिला जात आहे.
लॉक डाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दुधाला ३० ते ३५ रुपये बाजारभाव मिळत होता. आज दुधदर कमी झालेत परंतु खुरकाचे दर वाढलेले आहे सुग्रास १३४५, हिंदुस्तान १३६५, रत्ना १२५५ रुपये असे पशू खाद्याचे साधारण दर आहेत हे दूध दर कमी झाल्याबरोबर पशू खाद्याचे ही दर कमी झाले पाहिजेत असे यावेळी बापूराव सोलणकर यांनी सांगितले.