ताज्या घडामोडी

ढालगावात शारीरिक व मानसिक छळ करून महिलेस मारहाण : पती विरोधात गुन्हा

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी) : चंद्रकांत खरात कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील येथे लग्नात मानपान केला नाही, माहेरून सोन्याचे दागिने आणले नाहीत,असे म्हणून अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेवून शारीरिक व मानसिक छळ करून व विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून महिलेस मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवार दि 12 रोजी सकाळी 11वाजता घडली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आरोपी बिरू ज्ञानू खांडेकर (रा. ढालगाव) याच्या विरूध्द ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसाकडून समजलेली माहिती अशी की, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात छाया बिरू खांडेकर( वय 31) रा.ढालगाव, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली या विवाहित महिलेने मंगळवारी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत लग्नात काहीही दिले नसल्याने वारंवार टोचून बोलून ‘ तुझ्या आई वडिलांनी चांगला मानपान केला नाही. या कारणा वरुन वारंवार त्रास देवून माहेरून पैसे, सोन्याचे दागिने याची मागणी करून विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. याचं बरोबर विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीकडून वारंवार मारहाण करण्यात येत होती.
तसेच विविध कारणावरून विवाहितेच्या डाव्या मांडीवर, नाकावर कुराडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले आहे. व विवाहितेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी पतीने दिली असल्याचे विवाहितेने फिर्यादीत नमूद केले आहे.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.पोलिस ठाण्यात पती बिरु ज्ञानू खांडेकर रा.ढालगांव याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार एस.डी.मोहिते करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close