लोकांसाठी सँनेटायजर वाटप करणार : मंञी विश्वजीत कदम

आटपाडी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मूलभूत स्वच्छतेची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्याचसाठी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने सॅनेटायजरची निर्मिती केली आहे. कारखान्याचे संस्थापक आणि आपले प्रेरणास्थान डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने, आदरणीय मोहनदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेतला आहे. पलूस कडेगांव मतदारसंघात सॅनेटायझर वाटपाची मोहीम राबविताना मला अभिमान वाटतो आहे, असे कृषिमंत्री विश्वजित कदम म्हणाले.
कदम यांनी सांगितले की ,याचाच एक भाग म्हणून खानापुर व आटपाडी या दोन्ही तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सॅनीटाईजर मा. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते, मा प्रतापशेठ साळुंखे व युवक नेते जितेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी श्री शंकर बर्गे, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याकडे विटा येथे प्रांताधिकारी कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित युवानेते सुहासनाना शिंदे व इतर कार्यकर्ते होते.