महाराष्ट्रसांगली

पोलिसांच्या डबल सीट मोहिमेचे कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वत्र स्वागत

कवठेमहांकाळ(प्रतिनिधी): चंद्रकांत खरात कोरोना संचारबंदीच्या कालावधीत शासनाने लागू केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जात आहे.कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यातील रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे. कवठेमहांकाळ शहरातील रस्त्यावरील मोटरसायकलची वाहतूक कमी झाली आहे. डबल सीट मोटारसायकलस्वारावर दंडात्मक कारवाई केली आहे. कवठेमहांकाळ शहरात ‘ गाॅगल वाल्या , टोपी वाल्या — ब्रेक लाऊनी थांब, ए डबल सीट रे थांब थांब थांब —- ‘ असा पोलिसांचा आवाज ऐकावयास मिळत आहे. पोलिसांच्या डबल सीट मोहिमेचे कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वत्र स्वागत केले जात आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर समर्थपणे तोंड देण्यासाठी शासनाने लाॅक डाऊन व संचारबंदी लागू केली आहे.या संचारबंदीची अंमलबजावणी व माणसांची वर्दळ व वाहनांची रहदारी नियंतीत करणे महत्त्वाचे आहे.घरी रहा सुरक्षित रहा या हेतूने व रस्त्यावरील रहदारी कमी करण्यासाठी पोलिस विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे.त्यामुळे चार चाकी , दुचाकी वाहनांची रस्त्यावरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे..
महाराष्ट्रात सर्वत्रच लाॅक डाऊन सुरू करण्यात आला आहे.आज साधारणपणे लाॅक डाऊनला 50 दिवसात पूर्ण होत आहेत.पहिल्या दिवसापासून तहसीलदार बी.जी.गोरे, पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी,नगरपंचायतचे मुख्याधिकारी डाॅ.संतोष मोरे आदीसह विविध अधिकारी वर्गात समन्वय ठेवून संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे..
लाॅक डाऊनच्या पहिल्या आठवड्यात कवठेमहांकाळ शहरातील मोटरसायकलवरून फेरफटका मारणारे शायनिंग हिरोना कवठेमहांकाळ चेक पोस्ट वर पोलीसानी उभारलेल्या स्वागत कमानीत मोटरसायकल स्वारांचे तब्बल एक आठवडा स्वागत करण्यात येत होते. शांतता व सुव्यवस्था राखण्यात तरबेज असणारे व वेळच्या वेळी दखल घेण्यात निष्णात असलेले कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी चेक पोस्ट वरील पोलिसांच्या हाती काठी लाठी दिली होती.त्यामुळे पोलीसांनी काठीचा वापर मोटारसायकल स्वाराना प्रसाद देण्यासाठी केला.सुमारे पन्नास टक्के युवकांनी ‘ प्रसाद ‘ घेतला होता.
प्रसादानंतरही मोटरसायकलस्वार विना मास्क फिरताना दिसल्य्यास उठा बशा काढण्याची शिक्षा कवठेमहांकाळ येथील पोलीसांनी अंमलात आणली पण फरक काय पडतांना दिसेनासांगली झाला. त्यानंतर पोलीसानी मोटरसायकल स्वाराना हात जोडून ‘ घरी रहा सुरक्षित रहा ‘ विनंती केली.परंतु पोलीसांच्या गांधीगिरीने कवठेमहांकाळ शहरात फारसा फरक पडला नाही.
गांधीगिरीने आता कवठेमहांकाळचे तरूण व चालक सुधारत नाहीत हे लक्षात आल्याने विना लायसन, विना परवाना व विनाकारण फिरणार्या दंडात्मक कारवाईचा बडगा पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी उगारला.व दहा दिवसांत तब्बल 1 लाख 4 हजार रूपये दंड कवठेमहांकाळ पोलीसांनी वसूल केला.
कवठेमहांकाळ शहरातील चाणाक्ष व हुषार मोटरसायकल स्वारांनी कवठेमहांकाळचे मुख्य चेक पोस्ट चुकवून म्हसोबा चौक,राम मंदिर ,विध्यानगर , काॅलेजमार्गे जाणारा मार्ग पोलीसांच्या लक्षाथ येताच म्हसोबा चौकात आणखी एक चेक पोस्ट सुरू केले.तसेच अधून मधून राममंदीर पाईंटवर पोलीस उभा केले. व शहरातील वाहनांच्या रहदारीवर नियंत्रण आणले.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात केवळ 48 पोलीस सध्या कार्यरत आहेत.नागज,लोणारवाडी,कोकळे आदीसह चार जिल्हा र कर्नाटक पाॅईंट आहेत.कवठेमहांकाळ तालुक्यातील निमज,नागज व लांडगेवाडी येथील खुनाच्या तपासात पोलीस गुंतले होते. त्यामुळे कवठेमहांकाळ मधील पोलीसांची संख्या व कारवाई कमी झाली होती.
मोटरसायकलवर डबल सीट नाही व चारचाकी वाहनाला 1+2 चा नियम व सायंकाळी 7 ते सकाळीस 7 महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही.हा संदेश पोलीसांनी कवठेमहांकाळ शहरात दोन तीन दिवस पोहचविला.त्याची अंमलबजावणी शनिवारी कवठेमहांकाळ शहरात सुरू केली.
कवठेमहांकाळ चेकपोस्ट वर शनिवारी डबलसीट ,विना मास्क,विना लायसन फिरणार्या मोटारसायकल स्वाराना पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला.व सुमारे 100 जनावर कारणे दाखवा नोटीस व 40 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची जोरदार मोहीम पोलीसांनी राबविली.तर रविवारी कवठेमहांकाळ चेक पोस्ट, म्हसोबा चौक चेक पोस्ट व देशिंग काॅर्नर येथे पोलीसांनी डब्बल सीट अशा 60 मोटारसायकल स्वारावर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
एकंदरीत विचार करता कवठेमहांकाळ शहरातील डबल सीट मोटारसायकल स्वाराविरूध्द कवठेमहांकाळ पोलीसांनी कारवाईची जोरदार मोहीम राबविली आहे.त्यामुळे कवठेमहांकाळ शहरात तिन्ही ठिकाणी ‘ – – – – ए डबल सीट रे थांब – – थांब – – थांब .असा पोलीसांचा आवाज ऐकावयास मिळत आहे. —–

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close