‘इच्छापूर्ती’ मार्फत गुंफली 205 वी रेशीम गाठ..!

इच्छापूर्ती विवाह संस्थेची कौतुकास्पद कामगिरी
सांगली : संपूर्ण महाराष्ट्र सह सात राज्यात आपल्या 47 शाखा असणाऱ्या इच्छापूर्ती विवाह संस्थेमार्फत संपूर्ण समाजाला नवी दिशा देणारा, सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करून एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला!
सध्या कोरोना सारख्या महाभयंकर, आपत्तीजनक परिस्थितीतून संपूर्ण जगाची वाटचाल सुरू आहे, अशा परिस्थितीत आज सावळज मध्ये सावळज ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हंकारे मळ्यात हा विवाह सोहळा झाला.
हिंदू – चांभार समाजाच्या मुळच्या कुपवाड सांगली येथील चि.सौ.का. पुनम दिलीप व्हनकडे ह्या आज तासगाव तालुक्यातील सावळजच्या चि.प्रदीप राजकुमार हंकारे यांच्याबरोबर, मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी आणि इच्छापूर्ती विवाह संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तीत विवाहबंधनात गुंफल्या गेल्या आणि त्या सावळजच्या सुनबाई झाल्या!
विवाह समारंभात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सानिटायझर मारून, लग्नामध्ये प्रत्येकाला मास्क वाटप करण्यात आले, शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार पूर्णपणे, अगदी जेवताना सुद्धा, सोशल डिस्टन्सचे अंतर ठेवून हा आदर्श विवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला, मंगळवार दि.12 रोजी झालेला विवाह हा इच्छापूर्ती विवाह संस्थेतून 205 वा होता.
या विवाहासाठी रमेश पाटील, .सुनील चव्हाण, तानाजी कदम हे इच्छापूर्ती विवाह संस्थेचे पदाधिकारी आणि इच्छापूर्ती विवाह संस्थेचे संस्थापक एम.डी..दत्तात्रय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत सुद्धा दोन मनाचे मिलन होऊ शकते हे समाजापुढे अधोरेखित केले.