ताज्या घडामोडी

शैक्षणिक समस्यांसाठी मार्गदर्शक व समुपदेशकांची नियुक्ती

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. या सर्वांना करिअर तसेच विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा निहाय मार्गदर्शक व समुपदेंशक नेमले असून ते विनाशुल्क सेवा देणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सांगली जिल्ह्यासाठी 8 समुपदेशकांची निवड केली आहे.
निवड करण्यात आलेले समुपदेशक नाव संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे 1) संजय भरगोंडा पाटील, राणी सरस्वती कन्या शाळा पेठ भाग, सांगली कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0233-2373080, मोबाईल क्रमांक – 9730848074, 2) रमेश महादेव हल्लोळी, राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय, ढवळी, ता. वाळवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0234-2245549, मोबाईल क्रमांक – 8928764275 3) संभाजी नामदेव सरक, मराठा मंदिराचे श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज जत ता. जत कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02344-246255, मोबाईल क्रमांक – 9764601752, 4) सरोज बाळकृष्ण बाबर, देशभक्त आर. पी. पाटील माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालय, कुपवाड ता. मिरज कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0233-2346804, मोबाईल क्रमांक – 9790777612, 5) पांडुरंग सखाराम गुरव, गांधी एज्युकेशन सोसायटी, कुंडलचे शहीद सुरेश चव्हाण हायस्कूल, करोली ता. कवठेमहाकाळ मोबाईल क्रमांक – 9673469031, 6) विकास अशोक कांबळे, भारतमाता माध्य विद्यालय व उच्च माध्य विद्यालय, चिकुर्डे ता. वाळवा मोबाईल क्रमांक – 7798899092, 7) संभाजीराव दत्तात्रय शिंदे, श्री भवानी विद्यालय हायस्कूल, आबासाहेब खेबुडकर ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आटपाडी कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02343-220248, मोबाईल क्रमांक – 9423809925, 8) आण्णासाहेब गणपती भोसले, महात्मा गांधी विद्यालय, ता. तासगांव कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02346-254035, मोबाईल क्रमांक – 9730398216, असे आहेत.
मार्गदर्शनाचे काम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण, सांगलीचे प्राचार्य डॉ. आर. ए. होसकोटी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. डायट सांगलीच्या अधिव्याख्याता डॉ. वैशाली राजेंद्र भोई या जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close