सांगली

मुलगा राजवर्धनचा वाढदिवस आणि पालकमंञी जयंत पाटील यांची भावनिक पोस्ट

राजवर्धनचा आज वाढदिवस, योगायोगाने आदरणीय राजाराम बापूंच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या वाढदिवशीच राजवर्धनचा जन्म झाला. लहानपणापासून खेळ, अभ्यासेतर गोष्टी यांच्याकडे राजवर्धनचं कायम लक्ष असायचं. प्रत्येक घरातील लहान मुलाचा जसा अधिक लाड होतो, तसंच राजवर्धनच्याही बाबतीत झालं, पण राजवर्धन वयाच्या तुलनेने खूप लवकर समंजस व जबाबदारी घेपालकमंत्रीणारा झाला.
फुटबॉल म्हणजे त्याची सगळ्यात आवडती गोष्ट. आजही तो नियमित फुटबॉल खेळायला जातो, लहानपणापासूनच त्याने हि फुटबॉलची आवड जपलीये. जसं त्याचं खेळाकडे लक्ष असतं तसंच त्याचं अभ्यास, वाचन, नवनवीन गोष्टी समजून घेण्याकडेही असतं. कोणतीही नवीन गोष्ट, तंत्रज्ञान पाहण्यात आलं की ते काय आहे, कसं आहे हे समजून घेण्याकडे त्याचा कल असतो. ‘आपण नवीन गोष्ट वापरल्याशिवाय कशी कळणार?’ असं त्याचं म्हणणं !
कामाच्या बाबतीत त्याला कायम परफेक्शन लागतं, एखादी गोष्ट ठरली असेल तर ती त्या वेळेत ठरल्याप्रमाणे झालीच पाहिजे, ती नीट आणि उत्तम पद्धतीनेच झाली पाहिजे असा त्याचा प्रयत्न असतो. एकंदरच काम सर्वोत्कृष्ट करण्याचा त्याचा ध्यास असतो.
त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातील अत्यंत प्रतिष्ठित अशा संस्थेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. तिथे त्याने अत्यंत मेहनत घेऊन तो कठीण अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण झाल्यावर त्याने काही काळ एका बँकेत नोकरी देखील केली. जगातील वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला त्याला आवडतं.
माणसांची तो कायम कदर करतो, एखाद्या व्यक्तीतील एखादा चांगला गुण दिसला तर त्याला त्या व्यक्तीचं मनापासून कौतुक वाटतं. आपल्या बाजूबाजूला काय चालू आहे याकडे त्याच खूप बारीक लक्ष असतं.

आज राजवर्धनचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने राजवर्धनला अत्यंत सुदृढ असे दीर्घ आयुष्य लाभावे हिच माझी इच्छा !

– पालकमंत्री जयंत पाटील

Happy Birthday Rajvardhan ! ♥️

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close