ताज्या घडामोडी

गोपीचंद पडळकर,( वाचा आणि थंड बसा २९७)
झरे गावाजवळची पडळकरवाडी,ता आटपाडी, एका शिक्षकाच्या पोटी हा बछडा जन्मला, खूप कमी वयाचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले,मग चार चौघांसारखाच संघर्ष सुरू झाला, वयाच्या बाराव्या वर्षीच झरे येथील सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या गोपीचंद ने महादेव जानकर यांचे भाषण आयकले, आणि सुरू झाला एक संघर्ष,गोपीचंद पडळकर या दोन अक्षरांचा,आटपाडी ही माणदेशाचं भूषण असणारी नगरी,हुडयामाड्या माळरानाची नगरी,दहा वर्षातून एकदा वाहणाऱ्या माण नदीच्या कुशीतली नगरी,या आटपाडी च्या माणदेशी माणसाचं ठरलं होतं, कष्ट कष्ट आणि कष्ट, ज्या पडळकर वाडी चे गोपीचंद पडळकर त्या वाडीची ओळख म्हणजे डॉक्टर लोकांची पडळकर वाडी, गोपीचंद या हिऱ्याने सुद्धा ठरवले होते आपणही MBBS डॉक्टर व्हायचे पण नियतीच्या मनात वेगळेच होते, हा गोपीचंद रमला आटपाडी भोवतीच्या वाड्या वस्तीच्या माणसात,गावोगावच्या जत्रांना हा हजर रहायचा, वालुग असो, गजी खेळ असो,हा गोपीचंद प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहायचा, मग ओव्या म्हणणारे, गजी खेळणारे, अर्ध्या तासासाठी थांबायचे, आणि मग गोपीचंद सुरू व्हायचा, प्रचंड आत्मभान असणारा, अंगावर शहारे आणणारा परखड आवाज, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या काळजाला हात घालणारी भाषा बोलायचा, गोपीचंद घडत होता, आवाका वाढत होता,
आटपाडी नगरीला कायम चांगले हिरे मिळत गेले, आटपाडी च्या जनतेनं ही त्यांचा स्वाभिमान जपला, पेड ता तासगाव चा एक मुलगा स्व बॅरिस्टर टी के शेंडगे विलायतेला शिकण्यासाठी जाणार म्हणून याच आटपाडी च्या लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांना दिली होती,माजी आमदार स्वअण्णासाहेब लेंगरे,प्रचंड दानतअसणारे नारायण शेठ झंजे आणि लिंगीवरे गावचे एक सज्जन आणि प्रचंड कार्यकुशल असणारे सभापती स्व धुळाजी झिम्बल,यांचा वारसा पुढे चालवण्या एक हिरा पाहिजे होता, कारण आटपाडी च राजकारण हे एकतर “देशमुख वाड्यातून चालायचं नाहीतर धनगरांच्या वाड्यातून चालायचं,” कधी मिळून मिसळून राजकारण व्हायचं तर कधी संघर्ष करून, पण माणसं लढत राहिली,त्याच वेळी निंबवडे, लिंगीवरे,सारख्या अनेक वाड्या वस्त्या वरती यशवन्त सेनेच्या शाखा खोलल्या गेल्या होत्या,निंबवडे गावाजवळचे स्व पांडूरंग खटके जेडगे बुवा यांचाही संघर्ष होता, या अशा आटपाडी च्या नगरी मध्ये गोपीचंद घडत होता, सांगली जिल्हा रासप अध्यक्ष पदी निवड झाल्यावर याच वाघाने महादेव जानकर याना २००८मध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करून चांदीची तलवार भेट दिली, रासप चा विचार गावोगाव झिरपत होता, गोपीचंद प्रत्येक निवडणूक लढत राहिला माणसांची डोकी शेकरत राहिला, माढा लोकसभा निवडणुकीत माझ्या बरोबरीने सांगोला तालुक्यात फिरत राहिला, रिडालोसच्या माध्यमातून रासप तर्फे विधानसभा लढला, तरुणांना जोडत राहिला,,,,,,,,,
पण एका टप्प्यावरती गोपीचंद ने रासप सोडण्याचा निर्णय घेतला, माझ्यासारख्या रासप वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप वाईट वाटले पण काही गोष्टी घडत गेल्या,राष्ट्रीय नेत्याला कार्यकर्त्याला मिळणारा प्रतिसाद आवडीनसा झाला मात्र गोपीचंद चालत राहिला अठरा पगड जातीच्या लोकांना आपल्या आक्रमक भाषण शैलीच्या जोरावर आपली जागा बनवत राहिला, गलाई कामगार असोत की सांगली मधील फळ मार्केटवाले,की मुंबई वाले त्यांनी या गोपीचंद ला भरपूर प्रेम दिले, भाजप तर्फे निवडणूक लढत असताना, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी, प्रकाश आंबेडकर सारख्या नेत्यावर आपल्या नेतृत्वाची छाप पाडत राहिला, धनगर समाज आरक्षण लढा एका टप्प्यावर घेऊन जाण्यात यशस्वी झाला, अजून यशाचे गमक सापडण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे,२८८ च्या विधानसभेत दीड कोटी धनगर समाजाच्या हिताची भाषा बोलणारा महाराजा यशवंतराव होळकरांचा वारस म्हणून त्यांनी काम करावे, निवडणुका येतील जातील, पक्ष सत्तेवर येतील जातील, पण इथल्या गोर गरीब, दीन दलित याना हवा हवा असा वाटणारा एक नेता तयार व्हावा, की जो दीड कोटी धनगर समाजाचा आवाज बनून राहील,,,,,,,
असो ,,,,,फेसबुक पोस्टआहे,,,खूप लिहिण्यासारखं आहे पण थांबतो,,,,,
लक्ष्मण हाके

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close