पिवळ्या भंडाऱ्याची अस्मिता आणि मांगल्याचा गुलाल पाहायचाय आता…!

बिसूर : प्रस्थापितांच्या छाताडावर बिनधास्तपणे थयथय नाचणार एका विस्थापित नवतरूणाची माणुसकीच्या स्थापनेसाठी मारलेली ही एक बुलंद किंकाळी आहे. ग्रामीण जीवनात ‘अंधार’ पाहिलेल्या एका नवतरूणाने आपल्या हाती ‘अंगार’ घेऊन नवसमाजाच्या रचनेसाठी नवतरूणांना दिलेली ही एक आर्त हाक आहे..! ग्रामीण जीवनात समूळ परिवर्तन घडविणसाठी एका झपाटलेल्या नवतरूणाने सपाट झोपलेल्या नवतरूणांच्या अंतरंगात पेटविलेली नवी ज्योत आहे..! तळागाळातला माणूस आपल्या तळहातावर घेऊन त्याला ‘चार दिवस’ सुखाने कसे ‘चार घास’ मिळतील यासाठी धडपडणारा गोपीचंद पडळकर…! परंपरेच्या मळलेल्या वाटेने जाणाऱ्या मेढरांच्या मनात पुरोगामी विचारांची नवी पाऊलवाट निर्माण करावी लागते. अंधश्रध्दा, व्यसनाधिनता, अनारोग्य आणि अज्ञानाच्या अंध:कारात खिचपत पडलेल्या, दैववादी, दु:खी, निराश, उदध्वस्त आणि उदास लोकांना सुखी संपन्न जीवनासाठी प्रकाशाची वाट दाखवावी लागते. आपणास तुडविणाऱ्या, लुटणाऱ्या, संपविणाऱ्या, लुबाडणाऱ्या, फसविणाऱ्या आणि कारावासाची हवा दाखविणाऱ्या तथाकथित नराधमांचा कायमचा नायनाट करण्यासाठी हाती शिक्षणाची काठी घेऊन सिध्द असावे लागते. ‘सच्चे कोण आणि लुच्चे कोण’, ‘साव कोण आणि चोर कोण,’ ‘चांगले कोण आणि वाईट कोण,’ ‘शहाणे कोण आणि खुळे कोण’ आणि ‘तुपाशी कोण आणि उपाशी कोण’ हे ओळखण्यासाठी अनुभवी गुरूकडून ज्ञान घ्यावे लागते. आपणास गुलामगिरीच्या दावणीला कोण बांधतो आहे. आपला नको त्या कामासाठी कोण वापर करून घेतो आहे. आपला काहीच अपराध नसताना, कोण आपणास कारावासात धाडतो आहे आणि आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपणास कोण देशोधडीस लावतो आहे, हे समजन्यासाठीच डोळयाची पापणी उघडून काम करावे लागते. या साऱ्या गोष्टींचा विचार करूनच गोपीचंद पडळकरने गरीबांना सुखी करण्यासाठी, राबणाऱ्याना आनंदी करण्यासाठी आणि सामान्यांना शिक्षणातून असामान्य बनविण्यासाठी आपला निष्काम कर्मयज्ञ आरंभिला.
‘न्यायाला न्याय’ आणि ‘अन्याला अन्याय’, ‘सत्याला सत्य आणि असत्याला असत्य’, ‘धर्माला धर्म आणि अधर्माला अधर्म,’ ‘हक्काला हक्क आणि कर्तव्याला कर्तव्य,’ ‘भल्याला भला आणि नाठाळाला नाठाळ,’ नीतिला नीति आणि अनितीला अनिती,’ ‘वंदनीतेला वंदनीयता आणि नींदनीयता मानणारे’ गोपीचंद पडळकर..! म्हणूच ‘न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड’ असलेला गोपीचंद गरीबांच्या जीवनात प्रकाशपर्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. जवळ ना धड सत्ता, संपत्ती, शिक्षण आणि शक्ती, परंतु विवेकशील, विचारशील, संवेदनशील आणि धैर्यर्शील गोपीचंदने नवुवकांची संघटना बांधून प्रस्थापितांना ‘सळो की पळो’ करून सोडले. गरीबांच्या जीवनात नवी जाणीव निर्माण करणारा, त्यांच्या जीवनात आनंदाने जगणची पहाट फुलविणारा आणि नव विचारांचा आणि नव विकासाचा ध्येय ध्यास घेऊन लढत राहणारा नवयुवक आहे गोपीचंद..! ग्रामीण गरीब लोकांच्या जीवनात नवी उर्मी, नवी ऊर्जा निर्माण करणारा, त्याच्या वेदना, व्यथा, दु:खे, अडचणी आणि समस्या स्वत: भोगलेला असा गरीबांचा नायक गोपीचंद..! छत्रपती शिवाजी राजे, लोकमाता अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारा नायक आहे गोपीचंद..!
रात्रंदिवस मरणाच्या हालअपेष्ठा सोसणाऱ्या ग्रामीण गरीब माणसांच्याकडे पाहून गोपीचंदचे हृदय कारुण्याने ओथंबून गेले आहे. त्यामुळेच गोपीचंदच्या कारुण्याला कृतीची ‘धार’चढली. लोककलणाची ‘ओढ’ लागली. लोक विकासाची ‘आर्तता’ वाढली. गोपीचंदच्या मनात एका महामंत्राने धिंगाणा घातला आहे, तो महामंत्र आहे,
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही,
लढाईला माझ्या अंत नाही,
मी पुन्हा उठेन, पुन्हा लढेन,
एवढ्यावरच थांबायला आणि
शांत बसायला,
मी काही संत नाही…!’
यामुळेच आटपाडी, खानापूर, पंढरपूर, जत आणि सांगोला, पुणे, कोकण, मुंबई, पनवेल, लातूर, बीड, मराठवाडा, खानदेश, माणदेश, पश्चिम महाराष्ट्र भागातील नवयुवकांच्या हृदयपटलावर ‘माणदेशीचा बुलंद आवाज’, ‘माणदेशीचा स्वाभिमान,’ ‘माणदेशी मुलुख मैदानी तोफ’ अशी बिरुदावली कोरलेला ‘एकच छंद गोपीचंद’ हे नाव सर्वाच्या मुखी निनादात आहे.
दुष्काळग्रस्त भागातील लोकजीवनात चैतन्याची नस निर्माण करण्यासाठी, स्फूर्तीर्ची देवता जागी करण्यासाठी, अस्मितेची हवा भरण्यासाठी आणि स्वाभिमानाची तोफ डागण्यासाठी आत्मशक्तीत गरूडाच्या पंखांचे बळ घेऊन भरारी घेत घेत जटायूच्या रक्तबंबाळ पंखांनी तथाकथित रावणाचा मार्ग अडविण्याचा जीवघेणा प्रयत्नही केला गोपीचंदने..! दुष्काळग्रस्त भागासाठी अमृतकुंभ आणण्यासाठी गोपीचंदाने जीवाचे रान केले..! दुष्काळग्रस्त भागातील उदध्वस्त माणसांच्या जीवात जीव निर्माण करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर ममतेचा गोवर्धन धरला गोपीचंदने…! लोकजीवनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी गोपीचंदास समर्थ वाणी लाभली आहे. त्या वाणीत ओज आहे, तेज आहे, आव्हान आहे, जोम आहे आणि धुंदी आहे. उदध्वस्त लोकजीवनात प्रेमाचे भावबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे पुनरूज्जीवन साधन्यासाठी गोपीचंदने आपल्या स्वस्थ जीवनाला कायमची तिलांजली दिलेली दिसते.
गोपीचंद पडळकर हे एक ज्वलंत व्यक्तिमत्वाची वास्तववादी उर्जस्वल शब्दविलसीत कथा आहे..! लोकजीवनातील सारा ‘अंधार’ पिऊन त्यांना ‘उजेडा’त आणण्यासाठी गोपीचंद नावाच्या नवयुवकाच्या धडपडींचा हा उर्जस्वल हुंकार आहे…! त्यांच्या कार्याला आणि विचारांना लखलखनाऱ्या खडगाच्या पात्याची धार लाभली आहे. त्यांच्या मनात अधून-मधून निर्माण होणारे विचारतरंग लोक कल्याणासाठी तहानलेले दिसतात. पण नियतीच्या पोटातले खवळलेले स्पंद त्यांना थांबविता येत नाहीत. डॉक्टर होन्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करणारा गोपीचंद एक समर्थ संघटक होतो. ‘पुरूषस्य भाग्यम देवो ऽऽपि न जानाति कुतो मनुष्य:!’ हेच खरे वाटते. माणसांचे जीवन म्हणजे वर्तमानकाळाचा एक स्वैर विलास असतो. तेव्हा केव्हा सोनची माती होईल हे सांगता येत नाही. कधी-कधी हाती आलेली संधी अचानक संकट होते आणि कधी-कधी आलेले संकट संधीसारखे वाटते, या गोष्टीचे येथे ठायी ठायी प्रत्यतर येते. कोण लहान आणि कोण मोठा यापेक्षा लोककल्याणासाठी धडपडणारा एक सामान्य नवयुवक गोपीचंदच सर्वांना ‘आपला’ वाटतो, यातच गोपीचंदच्या मोठेपणाचे दर्शन घडते..!
विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आभाळमय खूप साऱ्या शुभेच्छा….!
आनंदा टकले
मायाक्का बिरदेव चॅरिटेबल ट्रस्ट बिसूर अध्यक्ष गजानन मानवर, उपाध्यक्ष सचिन एडके, सचिव महेश भिसे व सर्व सदस्य सल्लागार, मागर्दर्शक बिसूर