आरेवाडी आदर्श पुरुष बचत गटाच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप
- आदर्श बचत गटातर्फे अन्नधान्य कीटचे वाटप
- आरेवाडीतील गरजूंना मदतीचा ओघ सुरू
कवठेमंहाकाळ,आरेवाडी : आरेवाडीतील आदर्श पुरुष बचत गटाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या १५ कीटचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या १५ कुटुंबियांना मदतीचा आधार मिळाला.
लॉकडाऊनची झळ गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच बसली असून ज्यांची उत्पन्नाची साधने बंद पडली आहेत. गावातील गरजू कुटुंबांना मदती हात मिळत आहे. श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमात आदर्श बचत गटाने भर टाकत १५ कीटचे वाटप केले. हा आदर्श घेत एकमेकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी व प्रशासकीय मदत यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी इतर दानशुरांनीही पुढे यावे, अशा काहींनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच आबासाहेब साबळे, उपसरपंच बिरू कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, महांकाली साखर कारखान्याचे संचालक काशिलींग कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य अतुल कोळेकर, उपसरपंच अनिल कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*आदर्श पुरुष बचत गट*
योगदानकर्ते :- अनिल कोळेकर, विजय पवार, सुनिल बाबर, आप्पासो पवार, तानाजी कोळेकर, सागर कोळेकर, बाळासो सूर्यवंशी, जगन्नाथ बाबर, धनाजी बाबर, किशोर पवार.
वरील सदस्यांनी बचत केलेल्या पैशातून वेळेचे भान राखत अडचणीच्या प्रसंगी मदत केल्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले.