ताज्या घडामोडी
उद्योग सुरु करण्यासाठी www.permission.midcindia.org संकेतस्थळावर अर्ज करा
सांगली : जिल्ह्यातील उद्योजकांनी आपला उद्योग सुरु करण्यासाठी शासनाकडे www.permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज कारण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे. सदरच्या संकेतस्थळावर माहिती परिपुर्ण भरल्यास आपला उद्योग सुरु करण्याची परवानगी आपोआपच त्याच संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तसेच महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीतील फक्त अत्यावश्यक सेवा उद्योग घटक व ग्रामीण भागातील सर्व उद्योगांना त्यांच्या कामगारांच्या येण्याजाण्याची वाहतूक करण्यासाठी समर्पीत वाहन व्यवस्थेचा वापर करणे आवश्यक असल्यास सदर व्यवस्थेच्या समन्वयासाठी जिल्हा उद्योग केंद्र / प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेशी संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.
Share