मौजे कामेरी ता. वाळवा येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : जिल्ह्यातील मौजे कामेरी, ता. वाळवा या ग्रामपंचायत हद्दीत एकाची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत मौजे कामेरी, ता-वाळवा या ग्रामपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आला आहे त्या ठिकाणापासून 1 कि.मी. त्रिजेचा परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. यामध्ये मौजे कामेरी हद्दीतील जय भवानी विकास सोसायटी ते ग्रमपंचायत चौक, ग्रामपंचायत चौक ते शिवाजी पेठ चौक, अंगणवाडी इमारत ते महादेव दादू माने यांचे घर, अर्जुन यशवंत डांगे यांचे घर ते संतोष मारुती देसाई यांचे घर, जालिंदर नारायण पाटील यांचे घर ते राणी लक्ष्मीबाई पेठ चौक, राजाराम आबा रास्कर यांचे घर ते राजेंद्र ज्ञानू जेडगे यांचे घर, धनाजी मारुती जगताप यांचे घर ते तानाजी गणपती जाधव यांचे घर, अनिता अंकुश जाधव यांचे घर ते गोल्डन बिअर शॉपी दुकान ते संदे बेकर्स आणि जनरल स्टोअर्स यापरिसराचा समावेश असल्याची माहिती असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.