‘ शेतीसाठी दिवसा ८ ते १० तास वीजपुरवठा करावा’

महाराष्ट्र.प्रदेश भीमशक्ती संघटनेची पलूस तहसिलदार यांच्याकडे मागणी
भिलवडी : राज्यात लॉक डाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा दिवसा आठ ते दहा तास करावा. रात्री- अपरात्री त्यांची पाण्यासाठी होणारी अडचण थांबवावी,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कोविंड 19च्या प्रादुर्भावामुळे देशातील उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले आहेत. व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्याने वीज शिल्लक राहात आहे. त्यांमुळे वीज दिवसा देण्यात आली तर पलूस तालुक्यातील शेतकरी रात्री-अपरात्री शेतामध्ये जाण्याचे थांबेल, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष अमरजित कांबळे,पत्रकार पंकज गाडे,अख्तर पिरजादे,अमर मुल्ला,सिद्धार्थ कुरणे, शिवकुमार खारखंडे, शरद कुरणे आदी उपस्थित होते.