महाराष्ट्रसांगली

बांधकाम कामगारांच्या खात्यावर (DBT) व्दारे दोन हजार रूपयांचा थेट लाभ : सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव

बांधकाम कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये

सांगली : देशात 3 मे पर्यंत टाळेबंदी आहे .संबधित नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रूपयांचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई येथून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही दलाल घरोघरी जावून बांधकाम कामगारांना तुमचे पैसे येणार असून यासाठी काही ठराविक रक्कम द्या व तुमचे कागदपत्रे द्या असे सांगून फसविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अशा पध्दताने कोणी फसवणूक करीत असेल तर त्यांची तक्रार जवळील पोलीस ठाण्यात बांधकाम कामगारांनी करावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून कोठेही गर्दी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close